Swami Vivekananda Marathi Nibandh: नमस्कार मित्रांनो आज आम्ही भारतातील एक महान थोर पुरुष ज्यांनी भारतीय संस्कृतीला जगप्रसिद्ध केले म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्यावर मराठी निबंध आणला आहे. स्वामी विवेकानंद या मराठी निबंध मध्ये आम्ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचे वर्णन केले आहे.
स्वामी विवेकानंद मराठी निबंध Class १,२,३,४,५,६,७,८,९वी आणि १०वी ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात.
स्वामी विवेकानंद मराठी निबंध – Swami Vivekananda Marathi Nibandh
Swami Vivekananda Essay in Marathi (150 Words)
स्वामी विवेकानंदा चा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्र दत्त. बालपणी अतिशय खोडकर, तितकेच तापट, पण दयाळू व प्रेमळ होते. असं त्याची त्यांना चीड होती. ते सुदृढ आणि ताकदवान होते. शाळा कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी घोडेस्वारी आणि गायन या कलाही अवगत केल्या.
नरेंद्र चे गुरु श्री राम कृष्ण परमहंस यांनी योग्य शक्तीचा वारसा दिला. नरेंद्राने संन्यास स्विकारुन स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. नंतर ते हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी अमेरिकेत गेले आणि तेथे शिकागो इथल्या सर्वधर्म संमेलनात सहभागी झाले. येथील त्यांचे पहिलेच भाषण खूप गाजले. नंतर इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी अनेकांना उपदेश केला.
परदेशात आणि भारतात अनेक ठिकाणी फिरल्यावर स्वामीजी परत कलकत्त्याला आले. त्यांनी श्री रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. दुसऱ्यांदा अमेरिकेला भेट देऊन आल्यावर ४ जुलै १९०२ रोजी बेलूर मठामध्ये त्यांनी देहत्याग केला. कन्याकुमारी जवळ समुद्रात असलेल्या खडकावर स्वामीजी एक भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.
Swami Vivekananda Marathi Essay (250 Words)
स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील विश्वनाथ दत्त यांच्या घरी १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. विश्वनाथ दत्त यांच्या पत्नी भुवनेश्वरी देवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी शिवाचे कठीण व्रत सुरू केले होते. या व्रतामुळेच आपल्याला पुत्ररत्न लाभले, अशी त्यांची भावना होती. मोठ्या कौतुकाने त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘नरेंद्र’ असे ठेवले.
नरेंद्र हा बालवयात कोपिष्ट होता. शाळेतही तो फार खोड्या काढत असे. पण पुढे त्याच्यात पूजाअर्चा, भक्तिभाव यांची आवड निर्माण झाली. नरेंद्राला तीव्र बुद्धि्मत्तेचे वरदान लाभले होते. नित्यनेमाने व्यायामशाळेत जाऊन त्याने आपले शरीर सुदृढ बनवले होते. मोठा झाल्यावर नरेंद्र ब्राम्हणसमाजात जाऊ लागला. तेथे त्याच्या मनात देवाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. ‘खरोखरच देव आहे की नाही? देव असेल तर तो कोठे भेटेल?’ नरेंद्र ज्याला-त्याला हे प्रश्न विचारत असे. तेव्हा ब्राहमसमाजवादी पुढारी देवेंद्र यांनी नरेंद्राला स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे पाठवले आणि पुढे तेच नरेंद्राचे गुरू झाले.
परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो मानवातही आहे, ही शिकवण परमहंसांनी नरेंद्राला दिली. सुरवातीला नरेंद्राला हे मान्य झाले नाही. नंतर परमहंसांच्या शिकवणीतून हे सत्य नरेंद्राला प्रतीत झाले. तो कालिमातेचा भक्त बनला. रामकृष्ण परमहंसांनी या जगाचा निरोप घेताना नरेंद्राला सांगितले की, तू हिंदुत्वाचा प्रसार कर आणि त्यातील अमर तत्त्वज्ञान साऱ्या जगाला सांग.
१८९३ मध्ये नरेंद्र अमेरिकेतील सर्वधर्मीय परिषदेला उपस्थित राहिले. लोक त्यांना ‘स्वामी विवेकानंद’ म्हणून ओळखू लागले. त्या जागतिक परिषदेत विवेकानंदांनी भाषणाला सुरवात करताना ‘सभ्य स्त्री-पुरुषहो’ असे न संबोधता ‘माझ्या बंधु-भगिनींनो’ असे संबोधून उपस्थितांची मने जिंकली. त्या सभेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचे माहात्म्य सर्वांना पटवून दिले. आपले उर्वरित आयुष्यही त्यांनी या महान कार्यासाठी वेचले.
Swami Vivekananda Nibandh in Marathi (300 Words)
नरेंद्रनाथ दत्त म्हणजेच स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्ता येथे १२ जानेवारी १८६३ मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुनेश्वरीदेवी असे होते. स्वामी विवेकानंदांचे आजोबा दुर्गाचरण दत्त हे “संस्कृत” व “परीक्षण’ भाषेचे एक विद्वान होते.
नरेंद्रनाथ यांच्यावर लहानपणापासूनच महाभारत, रामायण व भक्तिभावा चा प्रभाव होता, कारण त्यांचे आई त्यांना ह्या गोष्टी सांगत असे. स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती आणि ते शाळेत सुद्धा सर्वात हुशार विद्यार्थी होते. फक्त अभ्यासातच नाही तर ते खेळण्यात हि तितकेच तरबेज होते. शाळेमध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये ते भाग घेत असे.
स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती त्यांनी रामायण, महाभारत, भगवत गीता, वेद आणि पुराण अशा धार्मिक पुस्तकांचे ज्ञान मिळवले होते. इतकेच नाही तर त्यांनी भारतीय गायन सुद्धा शिकले होते. स्वामी विवेकानंदांनी १८८४ ला आपले शिक्षण पूर्ण करून “आर्ट्स” चे डिग्री मिळाली होती त्यानंतर त्यांनी संस्कृत आणि बंगाली संस्कृतीचा अभ्यास केला होता.
रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंद ह्यांना घडवले होते आणि त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले होते. स्वामी विवेकानंद धार्मिक स्वभावाचे होते. त्यांना देशातील दारिद्र्य आणि अज्ञान पाहून खूप दुःख होत असे. भारतीय समाज सर्व समर्थ बनला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत असे.
स्वामी विवेकानंद ह्यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रसार पूर्ण जगभर पसरवण्याचे काम केले होते. अमेरिके मध्ये शिकागो येथे १८९३ मध्ये सर्वधर्मपरिषद झाली होती. तिथे ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. तिथे स्वामी विवेकानंदांचे भाषण एकूण सर्व लोक मंत्रमुग्ध झाले होते. त्यांच्या ह्या भाषणामुळे हिंदुधर्माचा आणि संस्कृतीचा प्रचार पूर्ण जगाला झाला होता आणि त्याबरोबरच स्वामी विवेकानंद ही विश्व प्रसिद्ध झाले.
अमेरिके वरून परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत फिरण्याचा निर्णय घेतला आणि आपले विचार लोकांना सांगायला सुरु केले. त्यांनी आपल्या ज्ञानाने लोकांना जागृत केले.
असा हा महापुरुष १९०२ साली आपल्या देशाला सोडून गेला आणि स्वर्गवासी झाला. स्वामी विवेकानंद यांचे कन्याकुमारी येथे भव्य स्मारक बांधण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजेच 12 जानेवारी ह्याला “नॅशनल युथ डे” या स्वरूपाने संपूर्ण भारतभर साजरा केले जाते.
Read Also: स्वामी विवेकानंद पर संस्कृत श्लोक
Marathi Essay on Swami Vivekananda (400 Words)
जेव्हा भारत पारतंत्र्यात होता, तेव्हा भारतीय समाजाला एक प्रकारची धर्मग्लानीच आली होती म्हणा ना! अशा अंधकारात १२ जानेवारी १८६३ रोजी दत्त घराण्यात एक दीपज्योती जन्माला आली. तिचे नाव नरेंद्रनाथ दत्त, म्हणजेच विश्वविख्यात स्वामी विवेकानंद.
स्वामी विवेकानंदांचे बालपण अत्यंत आनंदात व वैभवात गेले. विशाल नेत्र आणि विशाल भाल लाभलेले स्वामी विवेकानंद अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, सुदृढ, निर्भय, विलोभनीय असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना अभ्यास, खेळ, व्यायाम, संगीत, काव्य, पाकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत खूप रुची होती. लहान वयात आईकडून धार्मिक विचारांचे; तर मोठेपणी वडिलांकडून आधुनिक बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले. सत्य वचन व सत्य आचरण हा तर त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता.
१४-१५ वर्षांचे असतानाच अर्धाअधिक भारत त्यांनी पालथा घातला. त्या काळी त्यांनी भारतीयांची केविलवाणी अवस्था पाहिली. गुलामीच्या गर्तेत सापडलेल्या, स्वत्व विसरलेल्या हिंदू समाजाला पाश्चात्य शिक्षणाने भारून टाकले होते. परकीयांंच्या फसव्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाने भारतीय समाजाची दिशाभूल केली जात होती. हे सर्व पाहून विवेकानंद अत्यंत व्यथित व अस्वस्थ झाले.
रवींद्रनाथ टागोरांशी चर्चा करून आणि राजा राममोहन रॉय यांची तत्त्वे विचारात घेऊन विवेकानंदांनी सर्व धर्माचा आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली, त्यांचे इंग्रजी, संस्कृत, बंगाली इत्यादी भाषांवर प्रभुत्व होते. निरनिराळ्या धर्मातील व पंथांतील विद्वानांशी त्यांनी तत्त्वज्ञानावर चर्चा केली. त्यांनी रामकृष्ण परमहंसांचे शिष्यत्व पत्करले.
विवेकानंद हे १८८४ साली पदवीधर झाले. रामकृष्ण परमहंसांच्या प्रभावामुळे त्यांनी संन्यास घेतला आणि भिक्षेची झोळी घेऊन राष्ट्रकल्याणासाठी घराबाहेर पडले. अंतिम सत्य काय? या एकाच विचाराचा त्यांनी ध्यास घेतला आणि भारतभ्रमणाला सुरुवात केली. भारतभ्रमणानंतर कन्याकुमारीच्या समुद्रातील खडकावर बसून विचार करत असताना भारतातील दरिद्री, अज्ञानी जनतेसाठी सर्वस्व अर्पण करणारे अनेक स्त्री-पुरुष निर्माण केले पाहिजेत, असे त्यांना तीव्रतेने जाणवू लागले.
अमेरिकेतील शिकागो शहरी ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी सर्वधर्म परिषद भरणार होती. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद तेथे उपस्थित राहिले. परिषदेच्या दिवशी विवेकानंदांनी ‘माझ्या अमेरिकन बंधूंनो आणि भगिनींनो’ अशी भावपूर्ण शब्दांनी सुरुवात करून सभा जिंकली. त्यावेळी दोन मिनिटे सतत टाळ्यांचा गजर होत होता. या परिषदेत ते ज्या दिवशी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व अत्यंत विचारगर्भ भाषणाने हिंदू धर्माविषयीचे निबंध वाचत होते, त्या दिवशी ‘न भूतो न भविष्यति’ अशी गर्दी लोटली होती.
होमरूल लीगच्या नेत्या ऑनी बेझंट यांनी या प्रसंगी ‘एक योद्धा संन्यासी, समस्त प्रतिनिधींमध्ये वयाने लहान तरीही प्राचीन व श्रेष्ठ सत्याची जिवंत मूर्तीच’ असे स्वामी विवेकानंदांचे वर्णन केले आहे. विवेकानंदांनी खऱ्या धर्माची तत्त्वे सांगून धर्म हे उन्नतीचे साधन असावे, असे प्रतिपादन केले.
विवेकानंदांची प्रभावी भाषणशैली साऱ्या जगतात वाखाणली गेली. समस्त पाश्चात्त्य जगात विवेकानंदांची कीर्ती व भारताचा मान वाढला. अपूर्व सहनशीलता, असीम धैर्य, अलौकिक त्यागशक्ती यांचा सहज समन्वय म्हणजे स्वामी विवेकानंद ! ज्याने आपल्या देशाला आणि देशबांधवांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवले, ते स्वामी विवेकानंद माझी आवडती विभूती आहेत. या महान विभूतीने ४ जुलै १९०२ या दिवशी रात्री बेलूर या मठात महासमाधी घेतली.
Read Also: स्वामी विवेकानन्द का शिकागो में दिया गया भाषण
Essay On Swami Vivekanand In Marathi (450 Words)
प्रस्तावना
आपमची भारतभूमी ही महान संतांची, योगी, ऋषी – मुनींची, तसेच महान पुरुषांची भूमी आहे. या भारत भूमीवर महात्मा गांधीजींसारखे महान पुरुष जन्माला आले आहेत. ज्यांनी आपल्या कारकिर्दीत भारत देशाला महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे.
त्या सर्व महान पुरुषांपैकी स्वामी विवेकानंद हे एक होते. स्वामी विवेकानंद हे एक उत्तम संघटक आणि वक्ते होते. त्यांचे हृदय हे देशातील आणि परदेशातील गरिबांसाठी विखुरलेले होते.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ साली कोलकात्यामध्ये झाला. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ असे होते.
त्याच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त हे एक वकील होते आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. स्वामी विवेकानंद हे लहानपणापासून खूप हुशार होते.
शिक्षण
स्वामी विवेकानंद यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन १८७९ मध्ये प्रेसीडेन्सी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. स्वामी विवेकानंद यांनी सन १८८९ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी कोलकत्ता येथील जनरल असेम्ब्ली नावाच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.
तेथे त्यांनी इतिहास, तत्त्वज्ञान आणि साहित्य इत्यादी विषयांचं अभ्यास केला. स्वामी विवेकानंद यांनी बी.ए च्या परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केली.
ईश्वराची सेवा
स्वामी विवेकानंद यांनी उच्च शिक्षण घेतले. तसेच त्यांनी आपली उत्सुकता शांत करण्यासाठी ब्रह्मसमाजात गेले. येथे त्यांच्या मनाला समाधान मिळाले नाही म्हणून ते आपल्या वयाच्या १७ व्या वर्षी दक्षिणेश्वर येथील संत रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली.
रामकृष्ण परमहंस यांचा नरेंद्रवर खूप प्रभाव पडला आणि स्वामी विवेकानंदानी रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरु मानले. रामकृष्ण परमहंस यांच्याकडून दीक्षा घेऊन त्यांना भिक्षु होण्याची इच्छा होती.
त्यांनी स्वामी विवेकानंद याना समजावून सांगितले की, संन्यास घेण्याचा खरा हेतू हा मानव सेवा करणे होय. परमहंसांनी त्यांना दीक्षा देईल आणि त्यांचे नाव विवेकानंद असे ठेवले.
जागतिक धर्म परिषद
सन १८८३ मध्ये शिकागो येथे जागतिक धर्म परिषद झाली. त्या धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी सहभाग घेतला. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ही भाऊ आणि बहिणींनो यापासून केली.
त्यांचे भाषण लोकांनी अगदी काळजीपूर्वक ऐकले. त्यात ते म्हणाले की, या जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवी धर्म. केवळ प्राण्यांना शांती देणे हाच या धर्माचा उद्देश आहे. शांततेवर उपाय म्हणजे वैर, राग आणि कलह नव्हे तर प्रेम आहे.
हा हिंदू धर्माचा संदेश आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले की सर्व लोकांमध्ये आणि कोणत्याही प्राण्यामध्ये हा एकाच आत्मा वास करतो. स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाने प्रत्येक व्यक्ती खूप प्रभावित झाले.
रामकृष्ण मिशनची स्थापना
स्वामी विवेकानंदानी अमेरिका आणि युरोप मध्ये राहून हिंदू धर्माचा प्रचार केला. त्यानंतर ते भारतात परतले. त्यांनी कोलकाता येथे रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आज संपूर्ण जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा कार्यरत आहेत.
निधन
स्वामी विवेकानंद यांनी आपले संपूर्ण जीवन मानव सेवा करण्यासाठी समर्पित केले. तसेच त्यांनी वेदांताचा प्रसार केला. स्वामी विवेकानंद यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. त्यांनी अखेर ४ जुलै, १९०२ साली जगाचा निरोप घेतला.
निष्कर्ष
स्वामी विवेकानंद यांचे नाव धर्म प्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत आणि वेदांत मार्ग संत या सर्वांमुळे त्यांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे.
आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत भूमी आणि हिंदू धर्म यांची झालेली दुर्व्यवस्था रोखण्यासाठी स्वामी विवेकानंद सारख्या असणाऱ्या तेजस्वी विचारांची गरज आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा संपूर्ण देशात युवक दिन म्हणून साजरा केला जातो. असे हे महान व्यक्तिमत्त्व असणारे स्वामी विवेकानंद आपल्या भारत देशाला लाभले होते.
Read Also: स्वामी विवेकानंद के प्रेरणादायक सुविचार
Swami Vivekananda Marathi Madhe Nibandh (500 Words)
परिचय
स्वामी विवेकानंद एक महान नेता आणि तत्त्वज्ञ होते ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांचे प्रतिनिधित्व केले आणि जागतिक प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचे शिक्षण आणि तत्त्वज्ञान हे भारतीय तरुणांचे मार्गदर्शक प्रकाश आहेत आणि त्यांच्या कल्पनांनी लोकांना नेहमीच प्रेरणा दिली आहे आणि त्यांचे विचार नेहमीच उत्कर्ष पिढीसाठी उर्जा स्त्रोत म्हणून काम करेल.
स्वामी विवेकानंद कोण होते?
स्वामी विवेकानंद हे एक महान समाजसुधारक आणि भारताचे प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व होते. ते एक महान भारतीय संत होते. स्वामी विवेकानंद “उच्च विचारसरणीचे आणि साधा जीवन जगणारे” व्यक्तिमत्त्व होते.
बालपण व शिक्षण
कोलकाताच्या पवित्र आणि दिव्य ठिकाणी १२ जानेवारी १८६३ रोजी स्वामी विवेकानंद ह्यांचा जन्म झाला. श्री विश्वनाथ आणि आई भुवनेश्वरी देवी यांचा मुलगा स्वामी विवेकानंद यांना सुरुवातीच्या काळात “नरेंद्रनाथ दत्ता” या नावाने संबोधले जायचे.
नरेंद्र हे कौशल्य आणि बौद्धिक क्षमतेचे मूल होते जे आपल्या शाळेतील सर्व शिकवणी पहिल्यांदाच समजून घेत असत. त्यांचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात शिक्षित वकील होते. त्याची आई एक धार्मिक महिला होती, त्यांनी नरेनला लहानपणापासूनच त्याच्या चारित्र्याच्या निर्मितीमध्ये प्रभावित केले होते.
तिने प्रथम नरेनला इंग्रजी धडे शिकवले आणि त्यानंतर बंगाली वर्णमाला त्याच्याशी परिचित केली. नरेन यांनी कलकत्ता येथील महानगर संस्थेत शिक्षण घेतले. आणि प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, ते कलकत्ता येथे स्कॉटिश जनरल मिशनरी बोर्डाने स्थापन केलेल्या जनरल असेंब्ली संस्थेत सामील झाले, तेथून त्यांनी बी.ए. परीक्षा आणि कायदा अभ्यास गेला.
स्वामी विवेकानंद आणि रामाकृष्ण परमहमसाची भेट
विवेकानंद लहानपणापासूनच स्वभावाने खूप बौद्धिक होते आणि त्यांनी देवाच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह ठेवले होते. एके दिवशी त्यांची भेट श्री रामकृष्णाशी झाली, जे दक्षिणेश्वर काली मंदिरात पुजारी होते, त्यांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन विवेकानंद पूर्णपणे बदलले आणि रामकृष्णांना आपला आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारले.
रामाकृष्णच्या शिक्षणाद्वारे नरेन यांनी आपल्या नंतरच्या जीवनात, रामकृष्ण मिशनची व रामकृष्ण मठ स्थापना केली, जो आजपर्यंत स्वयंसेवी समाजसेवा, गरीब, विमुक्त, जाती, आणि धर्म याकडे सेवा देण्यास गुंतलेला आहे. नंतर साधू झाल्यावर नरेन यांचे नाव “स्वामी विवेकानंद” असे ठेवले गेले.
स्वामी विवेकानंदांचे कार्य
आपल्या गुरूच्या निधनानंतर, विवेकानंद यांनी १८९३ मध्ये शिकागो संसदेच्या धर्मांच्या अधिवेशनात हजेरी लावली, जिथे त्यांनी जगाला हिंदुत्वाची ओळख करून दिली, ज्याचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.
त्यांची शिकवण आणि मौल्यवान कल्पना ही भारताची सर्वात मोठी तात्विक संपत्ती आहे, आधुनिक वेदांत आणि राज योग त्यांचे तत्वज्ञान तरुणांना एक प्रेरणादायक प्रेरणा आहे. त्यांनी बेलूर मठ, रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली, जे विवेकानंदांचे धार्मिक आणि आध्यात्मिक शिकवण प्रसारित करते आणि शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातही मदत करते.
स्वामी विवेकानंदांचे काही विचार
- जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपण देवावर विश्वास ठेवू शकत नाही.
- आपण दुर्बल आहात असा विचार करणे हे सर्वात मोठे पाप आहे.
- आपण आत्मा, मुक्त आणि चिरंतन, सदैव मुक्त, कधीही धन्य आहात पुरेसा विश्वास ठेवा आणि आपण एका मिनिटात मोकळे व्हाल.
- आपल्या जीवनात जोखीम घ्या, आपण जिंकल्यास आपण नेतृत्व करू शकता! आपण हरल्यास, आपण मार्गदर्शन करू शकता!
- ध्यान मुर्खांना संत बदलू शकते परंतु दुर्दैवाने मूर्ख कधीच ध्यान करीत नाहीत.
- एकाग्रतेची शक्ती ही ज्ञानाच्या तिजोरीत राहण्याची एकमेव गुरुकिल्ली आहे.
- उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठण्यापर्यंत थांबू नका.
- हृदय आणि मेंदू यांच्यात संघर्ष झाल्यास आपल्या हृदयाचे अनुसरण करा.
निष्कर्ष
४ जुलै १९०२ रोजी त्यांचे निधन झाले. स्वामी विवेकानंद हे संपूर्ण देशातील एक महान देशभक्त आणि महान आध्यात्मिक मनुष्य होते, ज्यांना जगामध्ये अस्सल विकास, जागतिक अध्यात्म आणि शांतता हवी होती.
नरेंद्रनाथ दत्त मराठी निबंध (550 Words)
ज्वलंत आणि प्रखर व्यक्तिमत्त्व, हिंदू धर्म आणि अध्यात्म यांचा विस्तार आणि प्रसार हा अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने करणारे भारतीय संन्यासी, योगी स्वामी विवेकानंद हे एक थोर पुरुष होते. कोलकातामध्ये सिमलापल्ली या ठिकाणी इ.स. 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते.
त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रला लहानपणापासून दर्शनशास्त्र, इतिहास, कला, साहित्य या विषयांत रुची होती. धार्मिक ग्रंथ आणि त्यामागचे सत्य जाणून घेण्याची तर जणू उत्कटता त्यांच्यात ठासून भरली होती. लहानपणी संगीताची आवडही त्यांना होती. त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून संगीताचे रितसर शिक्षण देखील घेतले होते.
नरेंद्रनाथांनी सुरुवातीचे शिक्षण घरीच घेतले. त्यानंतर १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी जनरल
असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तर्कशास्त्र आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची तर १८८४ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
स्वामी विवेकानंद एक अत्यंत तर्कशुद्ध आणि विचारशील मनुष्य होते. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि त्यानंतरच्या काही काळात डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल इत्यादी महान व्यक्तींच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवाद त्यांना भावला होता. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता.
पाश्चात्त्य तत्त्वज्ञानासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही चांगलाच अभ्यास केला होता. त्यांना ‘श्रुतिधारा’ म्हणजे विलक्षण स्मरणशक्ती असलेला मनुष्य असे म्हटले जात असे. त्यांची वाचनाची गती खूपच चांगली होती. एका
सामान्य व्यक्तीपेक्षा खूपच जलद गतीने ते एखादे पुस्तक वाचून पूर्ण करीत असत. अशा या असामान्य नरेंद्रचे खऱ्या अर्थाने आयुष्य बदलले ते म्हणजे रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर!
इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्यांनी नरेंद्रची प्रतिभा ओळखली. कुशाग्र बुद्धीचा हा व्यक्ती नक्कीच अध्यात्मिक क्षेत्रात उच्च शिखर गाठू शकतो असा गुरु रामकृष्ण यांना विश्वास होता. अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी आणि धर्मप्रसार कार्यात वाहून नेण्यासाठी स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण यांच्यासोबत शिष्य म्हणून राहू लागले. अध्यात्मिक साधना आणि गुरूच्या सहवासामुळे नरेंद्र हा दिवसेंदिवस प्रगती करत होता.
रामकृष्ण परमहंस यांनी सुरू केलेले कार्य नरेंद्रच्या हाती सोपवले जाणार होते. पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यास दीक्षा देऊन त्यांचे नामकरण ‘स्वामी विवेकानंद’ असे केले. रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात केली.
रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी भारतभ्रमण करण्यास बाहेर पडले. भारतभ्रमण केल्यानंतर त्यांना भारताची तसेच पूर्ण दुनियेची दयनीय अवस्था समजली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपला धर्मप्रसार सुरू केला. यावेळी त्यांनी परदेशगमन देखील केले. 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील आर्ट इन्स्टिट्यूट, शिकागो येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले होते.
तेथे त्यांनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट सुरू केला. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
पुढे त्यांनी वेदान्त आणि योग या विषयावर अमेरिका, इंग्लंड आणि काही युरोपीय देशांमध्ये व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड या देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापन केली. 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंद यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. त्यांचे तत्त्वज्ञान हे नेहमीच स्मरणीय होते आणि राहील. “उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका” हा त्यांचा संदेश आजही तेवढाच प्रसिद्ध आहे. असा हा महान योगी, संन्यासी, तत्वज्ञानी, स्वतःच्या कर्तुत्वाने पूर्ण विश्व प्रकाशित करून गेला.
स्वामी विवेकानंद वर निबंध मराठी (850 Words)
१२ जानेवारी १८६३ कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. जणू काही चेहर्यावरून तेज ओसंडून जात आहे. असेच बघणार्यांना वाटले. या तेजस्वी बालकाच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी.विश्वनाथ दत्त हे कोलकत्त्यातील एक प्रसिद्ध वकील होते.
त्यांनी धंद्यात खूप नाव मिळविले होते. पैसाही चांगला मिळविला होता ते स्वभावाने सदाचारी, पत्नी हि भुवनेश्वरी समाधानी व धार्मिक होती. त्यामुळे त्यांचा संसार सुखासामाधानीच होता. तेजस्वी बालकाचे बारसे मोठ्या थाटामाटातच झाले. व त्याचे नाव ठेवले नरेंद्र ! हा नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद म्हणून जग प्रसिद्ध झाला.
सातव्या वर्षी त्याना शाळेत घातले. शाळेत ऐकलेल्या शिव्या तो शिकला. घरात सर्वांना तो शीव्या देऊ लागला. आईने त्याला शाळेतून काढून टाकले व स्व:त शिकवू लागली. बंगाली व इंग्रजी भाष्या त्यांनी नरेंद्र ला शकविल्या तसेच रामायण-महाभारतातील गोष्टी सांगितल्या पुढे नरेंद्र शहाणा झाला. व खूप हुशारही झाला. परत आठव्या वर्षी त्याना शाळेत घालण्यात आले.
पहिल्याच वर्गात त्यांनी अमरकोश पाठ केला. यावरून त्याची बुद्धी किती असामान्य असेल याची कल्पना येते. एका मुसलमान गवयाकडे गायन शिकले.आखाड्यात जाउन कुस्त्या खेळू लागले. चांगले गोटीबंद शरीर कमाविले. त्यामुळे वर्गातील मुलें त्यांना भीत असत. ते सर्वांचे पुढारी होते. त्यांच्या नुसत्या शब्दाने त्यांची भांडणे मिटत. १८७७ साली ते वडिलान सोबत रायपूरला गेले. त्यावेळी बैलगाडीतून प्रवास करावा लागला.
तिथे त्यावेळी शाळा तर नव्हतीच त्यावेळी त्याना तेथे रानावनातून फिरण्याचा व सृष्टी सौंदर्य पाहण्याचा प्रसंग आला. व त्याचाच त्यांनी अभ्यास केला. १८७९ मध्ये परत कोलकत्त्याला आले.परत शाळा सुरु झाली त्यावेळी त्यांनी वाचनालयात जावून मोठ्मोठी ग्रंथ वाचलीत. त्यावरून अनेक विषय आत्मसाथ केले. फक्त एक दिवसात त्यांनी भुमितीच्या चारी भागांचा अभ्यास केला. ते खेळातही भाग घेत तसेच घोड्यावर बसण्यातही पटाईत होते. वादविवाद करण्यात ते सर्वांनाच हार्वीत असत. ते गाणे म्हणू लागले कि सारेच स्तब्ध होवून ऎकत. त्यांचा आवाज फारच गोड होता.
नरेंद्राने ब्राम्हण समाजात प्रवेश केला. मूर्ती मध्ये देव नाहीत,जाती नाहीश्या केल्याच पाहिजेत, स्त्रियांना शिक्षण दिलेच पाहिजेत, हे विचार ऐईकून त्यांच्या मनात गोंधळ होत असे. तेव्हा देव खरच आहे कि नाही? असल्यास कोठे भेटेल? असल्यास त्याची भेट कोन घडवून देणार? या सर्व विचारांनी त्यांचे मन अस्वस्त झाले. ब्राम्हण समाजाचे देवेंद्र त्यांचे प्रश्नाचे समाधान कारक उत्तर देऊ शकले नाहीत.
तेव्हा कॉलेजचे प्राचार्य हेस्टी यांनी त्यांना रामकृष्ण परमहंस यांच्या कडे पाठविले. संत परमहंस यांनी आपल्या तिक्ष्न्न दृष्टीने त्यांच्या डोळ्याकडे पाहिले. ते आपल्या भक्तांना म्हणाले. “हा नरेंद्र मानव जातीच्या उद्धारासाठीच जन्मलेला आहे, तो हिंदुधर्म आणि हिंदुस्थानची मान साऱ्यां जगात उंचावेल!” नरेंद्रला ते खरे वाटेना त्याने रामकृष्णांना विचारले,” तुम्ही देव पाहिला आहे कां?” त्यावर रामकृष्ण उत्तरले, ”होय मी देव पाहिला आहे, त्याच्याशी बोललो पण आहे तुलाहि देव सहज भेटेल.” ” केव्हा भेटेल मला देव? नरेंद्राने विचारले, ” जेव्हा तुझ्या मनाला देव भेटण्याची तळमळ लागेल तेव्हा . “रामकृष्णांनी म्हटल्या नंतर हि त्यांचा त्यावर विश्वास बसेना, तेव्हा रामकृष्णांनी त्यांच्या हृदयाला स्पर्श केला. त्याच बरोबर सर्वत्र तेजाचे लोळ उठले. सर्वत्र प्रकाश पसरला. व नरेंद्रला सर्वत्र प्रकाश व परमेश्वरच दिसू लागला!
सन १८८१ साली डफ कॉलेजातून उत्तम गुणांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नरेंद्राने वडिलांच्या मृत्यू नंतर नोकरी करून घराचा भार उचलण्या ऎवजि संन्यास घेतला म्हणून आप्तेष्ट मंडळी त्यांच्या मागे त्यांची निंदा करू लागले पण नरेंद्रना गुरु कडून योग्य मार्ग मिळाला होता. आणि त्या मार्गानेच जाण्याचा त्यांनी निर्धार केला होता. थोड्याच दिवसांनी रामकृष्ण कर्क रोगाने आजारी पडले.
त्यांना उपचारासाठी काशीपूर येथे नेले. त्यांच्या साठी नरेन्द्रही त्यांच्या सोबत गेला. रामकृष्ण त्यांना म्हणाले ”बेटा माझी सर्व योग शक्ती मी तुला दिली आहे. त्याच्या जोरावर तू हिंदूधर्म आणि तत्वज्ञान यांचा जगभर प्रसार कर, आपल्या राष्ट्राचा उद्धार कर! “ऎवढे बोलून १५ ऑगष्ट १८८६ रोजी रामकृष्णांनी जगाचा निरोप घेतला. नरेंद्र व रामकृष्ण यांच्या ईतर शिष्यांनी बडानगर येथे त्यांचा मठ स्थापन केला, १८८८ साली नरेंद्र २५ वर्षाचे झाले. सर्व भारत फिरून बघावा अशी त्यांची ईच्छा झाली.
आणि तेव्हाच प्रवासास निघाले. काशी, अयोध्या, गया, आग्रा, वृंदावन असे करीत करीत ते पायीच फिरले, नरेंद्रला लोक पुढे स्वामी विवेकानंद म्हणू लागले. त्यांनी १८९० साली रामकृष्णांच्या पत्नी शारदादेवी यांचा आशीर्वाद घेतला बाहेर पडले. स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला पचले. तेथील देवालयात त्यांनी ध्यानधारणा सुरु केली. त्यांना रामकृष्णांनी दर्शन दिले. अमेरिकेत भरणार्या सर्वधर्म परिषदेत जाण्याची त्यांना आज्ञां दिली. १८९३ ला त्यांना ३० वर्षे पूर्ण झाली. स्वामींच्या आशीर्वादाने खेतडीच्या महाराजांना पुत्र प्राप्ती झाली. स्वामी विवेकानंदा ना महाराजांनी अमेरिकेला जाण्यासाठी योग्य पोशाख व भाडे खर्चाला पैसे दिले.
३१ मे १८९३ रोजी स्वामी अमेरिकेला निघाले. त्यांनी रामकृष्णांच्या फोटोला वंदन करून कालीमातेचे स्मरण केले. व भगव्या रंगाचा पोशाख चढविला. व भगवा फेटा गुंडाळला भगवत गीता घेवून त्यांनी बोटीवर प्रवास सुरु केला. चीन, जपान, नंतर ते शिकागो बंदरात उतरले. ११ सप्टेंबर रोजी सर्वधर्म परिषदसुरु झाली. हजारो संख्येने प्रतिनिधी हजर होते. देशोदेशीचे ध्वज फडकत होते.
ख्रिस्ती धर्माचे लोक जास्त आले असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचेच गुणगान ते करीत होते. शेवटी स्वामींची वेळ आली. प्रथम ते घाबरे. पण धीर करून त्यांनी भाषणाला सुरवात केली. “माझ्या अमेरिकन बंधू -भगिनींनो! या त्यांच्या पहिल्याच वाक्याला सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला, तो तब्बल दोन ते तीन मिनिटे चालला. त्यांनी हिंदूधर्मावरील परिपूर्ण भाषण दिले.
परिषद संपली, पण स्वामींचे कार्य संपले नव्हते. त्यांनी अमेरिकेतील मोठमोठ्या शहरात व्याख्याने दिली. हिंदूधर्म, तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी न्यूयार्क मध्ये अभ्यासवर्ग सुरु केले. अनेक स्त्री-पुरुष त्यांचे शिष्य झाले.हिंदूधर्म, तत्वज्ञान यांचा प्रसार केला. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले. रामकृष्णा नची भविष्या वाणी खरी ठरली! त्यांचे शिष्य नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद यांनी जगभर वेदांताचा प्रसार केला. भारताचे नाव उज्ज्वल केले! १८९७ साली स्वामी विवेकानंद भारतात परत आले.
१मे १८९७ रोजी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. व लोक सेवेला सुरवात केली. अमेरिकेत असतानाच ते आजारी पडले. नंतर त्यांची प्रकृती जास्तच बिघडली होती. थोडे दिवस विश्रांती घेऊन ते परत अमेरिकेला जावून आले. १९०२ साली त्यांची प्रकृती जास्त बिघडली मठाचे काम त्यांनी दुसर्यावर सोपविले. ४ जुलै १९०२ साली त्यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
Swami Vivekananda Essay in Marathi PDF
आम्ही पीडीएफमध्ये स्वामी विवेकानंद मराठी निबंध देखील प्रदान केला आहे, जो आपण आपल्या प्रकल्पात किंवा इतर कोणत्याही कामात मुद्रित आणि वापरण्यास सक्षम असाल.
१२ जानेवारी स्वामी विवेकानंद भाषण (Swami Vivekananda Speech in Marathi)
जन्म, बालपण व शिक्षण
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. बालपणापासून विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन गोष्टी प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या. त्या म्हणजे ते वृत्तीने श्रद्धाळू व कनवाळू होते व दुसरे म्हणजे ते बालपणात कोणतेही साहसी कृत्य बेधडकपणे करत. स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण कुटुंब अध्यात्ममार्गी असल्यामुळे बालपणात त्यांच्यावर धर्मविषयक योग्य संस्कार झाले. १८७० साली त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत पाठवण्यात आले.
शाळेत असतांनाच अभ्यासाबरोबर विवेकानंदांनी बलोपासनाही केली बालपणात स्वामी विवेकानंदांमध्ये स्वभाषाभिमान होता, हे दर्शवणारा एक प्रसंग. इंग्रजी शिक्षणाच्या वेळी त्यांनी “ही गोर्यांची म्हणजे जेत्याची भाषा मी मुळीच शिकणार नाही.” असे म्हणून सुमारे ७-८ महिने ती भाषा शिकण्याचेच नाकारले. पुढे नाईलाजास्तव ते इंग्रजी शिकले. विवेकानंदांनी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांच्या कुळाची व शाळेची कीर्तीध्वजा उंचावली. पुढे कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी `तत्त्वज्ञान’ या विषयात एम्.ए. केले.
गुरुभेट व संन्यासदीक्षा
नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, “भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्वरीला श्रीरामकृष्णांकडे जा.” एके दिवशी त्यांचे शेजारी श्री.
सुरेंद्रनाथ यांच्याकडेच श्री रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. श्री रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी श्री रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, ‘नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, “हे सारे माझ्याने होणार नाही.” श्री रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, “काय? होणार नाही? अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण ‘स्वामी विवेकानंद’ असे केले.धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात: रामकृष्ण मठाची स्थापना
श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्त तेथे राहू लागले.
स्वामी विवेकानंद यांनी गाजवलेली सर्वधर्मपरिषद
शिकागोला जाण्याविषयी पूर्वसूचना
एके दिवशी रात्री अर्धवट जागे असतांना स्वामी विवेकानंदांना एक अद्भुत स्वप्न पडले. श्री रामकृष्ण ज्योतिर्मय देह धारण करून समुद्रावरून पुढे जात आहेत व स्वामीजींना आपल्या मागे येण्यास खुणावत आहेत. क्षणार्धात स्वामीजींचे डोळे उघडले. त्यांचे हृदय अवर्णनीय आनंदाने भरून आले. त्याबरोबरच त्यांना `जा’, अशी देववाणी सुस्पष्टपणे ऐकू आली. परदेशी जाण्याचा संकल्प दृढ झाला. एकदोन दिवसांतच प्रवासाची सारी तयारी पूर्ण झाली.
धर्मपरिषदेसाठी रवाना
३१ मे १८९३ रोजी ‘पेनिनशुलर’ बोटीने मुंबईचा किनारा सोडला. १५ जुलैला कॅनडातील व्हँकुव्हर बंदरात येऊन स्वामीजी पोहोचले. तेथून आगगाडीने अमेरिकेतील प्रख्यात अशा शिकागो महानगरात आले. आयोजित धर्मपरिषद ११ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे त्यांना समजले. धर्मपरिषदेत भाग घेण्यासाठी आवश्यक असलेले परिचयपत्र त्यांच्याजवळ नव्हते.
त्यात पुन्हा प्रतिनिधी म्हणून नाव नोंदवण्याची मुदतही उलटून गेली होती. परदेशात स्वामीजी जेथे कुठे जात, तेथे त्यांच्याकडे लोक आकृष्ट होत. पहिल्याच दिवशी हार्वर्ड विद्यापीठातील ग्रीक भाषेचे प्रा. जे.एच्. राईट हे स्वामीजींशी चार तास बोलत बसले. स्वामीजींच्या प्रतिभेने व बुद्धीमत्तेने ते इतके मुग्ध झाले की, धर्मपरिषदेत प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळवून देण्याची सारी जबाबदारी त्या प्राध्यापकांनी स्वत:वर घेतली.
शिकागो सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांचा सहभाग
श्रेष्ठतम अशा हिंदु धर्माची ओळख या सुवर्णभूमीतील सत्पुरुषाने जगाला करून देणे हा दैवी योगच होता. अमेरिकेतील शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी झालेल्या सर्वधर्मपरिषदेच्या माध्यमातून सार्या जगाला आवाहन करणारे स्वामी विवेकानंद हिंदु धर्माचे खरे प्रतिनिधी ठरले. सोमवार, ११ सप्टेंबर १८९३ रोजी सकाळी धर्मगुरूंच्या मंत्रोच्चारानंतर संगीतमय वातावरणात धर्मपरिषदेचा शुभारंभ झाला.
व्यासपीठावर मध्यभागी अमेरिकेतील रोमन कॅथलिक पंथाचे धर्मप्रमुख होते. स्वामी विवेकानंद हे कोणत्याही एका विशिष्ट पंथाचे प्रतिनिधी नव्हते. ते सार्या भारतवर्षातील सनातन हिंदु वैदिक धर्माच्या प्रतिनिधीच्या नात्याने या परिषदेस आले होते. या परिषदेस सहा ते सात हजार स्त्री-पुरुष उपस्थित होते. अध्यक्षांच्या सूचनेनुसार व्यासपीठावरील प्रत्येक प्रतिनिधी आपली अगोदरच तयार केलेली भाषणे वाचून दाखवत होते.
स्वामीजींनी आपले भाषण लिहून आणले नव्हते. शेवटी गुरूंचे स्मरण करून स्वामीजी आपल्या जागेवरून उठले. `अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो’ या शब्दांनी सुरुवात करून त्यांनी सभेला संबोधित केले. त्यांच्या चैतन्यपूर्ण आणि ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध झाले. या शब्दांत अशी काही अद्भुत शक्ती होती की, स्वामीजींनी ते शब्द उच्चारताच हजारो स्त्री-पुरुष आपल्या जागीच उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळयांचा प्रचंड कडकडाट केला.
लोकांचा हर्षध्वनी आणि टाळया थांबता थांबेनात. स्वामीजींच्या त्या भावपूर्ण शब्दांतील जिव्हाळयाने सार्या श्रोत्यांची हृदये स्पंदित झाली. `भगिनींनो आणि बंधूंनो’ या शब्दांनी सार्या मानवजातीला आवाहन करणारे स्वामी विवेकानंदच एकमेव वक्ते होते.
“हिंदु समाज पददलित असेल; पण घृणास्पद नाही. तो दीन असेल, दु:खी असेल; पण बहुमूल्य अशा पारमार्थिक संपत्तीचा उत्तराधिकारी आहे. धर्माच्या क्षेत्रात तो जगद्गुरु होऊ शकतो, अशी त्याची योग्यता आहे.” अशा शब्दांत हिंदु धर्माची महती वर्णन करून अनेक शतकांनंतर स्वामी विवेकानंदांनी हिंदु समाजाला त्याच्या सीमा किती विस्तृत आहेत, हे दाखवून दिले. स्वामीजींनी कोणत्याही धर्माची निंदानालस्ती किंवा टीका केली नाही.
कोणत्याही धर्माला त्यांनी क्षुद्र म्हटले नाही. परकीयांकडून देण्यात आलेली घृणास्पद वागणूक व अपमान यांचा चिखल उडालेल्या हिंदु धर्माला त्यांनी तेथून बाजूला काढले आणि त्याच्या मूळ तेजस्वी रूपासह जागतिक सर्वधर्मपरिषदेत सर्वोच्च आसनावर विराजमान केले. या परिषदेत हिंदुस्थानाबद्दल बोलतांना ते म्हणतात, “हिंदुस्थान ही पुण्यभूमी आहे, कर्तव्यभूमी आहे, हे निखालस सत्य आहे.
ज्याला अंतर्दृष्टीचे व आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल, तर ते म्हणजे हिंदुस्थान होय! प्राचीन काळापासून इथे अनेक धर्मसंस्थापकांचा उदय झाला. त्यांनी परमपवित्र व सनातन अशा आध्यात्मिक सत्याच्या शांतीजलाने लाही-लाही होणार्या जगाला तृप्त केले आहे. जगात परधर्माबद्दलची सहिष्णुता व जिव्हाळा फक्त याच भूमीत अनुभवता येतो.”
प्रवचनांद्वारे प्रसारकार्य
परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करून कोलकात्यात परतल्यावर नागरिकांनी स्वामीजींचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. ‘माझ्या मोहिमेची योजना’, ‘भारतीय जीवनात वेदान्त’, ‘आमचे आजचे कर्तव्य’, ‘भारतीय महापुरुष’, ‘भारताचे भवितव्य’ यांसारख्या विषयांवर त्यांनी व्याख्याने देण्यास सुरुवात केली. स्वामी विवेकानंद यांनी परदेशी व स्वदेशी दिलेल्या व्याख्यानांतून आपली मते वेळोवेळी ओजपूर्ण भाषेत मांडली. स्वामी विवेकानंदांच्या या विचारांचा फार मोठा परिणाम झाला. परदेशातही त्यांनी वेदान्ताच्या वैश्विक वाणीचा प्रचार केला होता. त्यामुळे आर्यधर्म, आर्यजाती, आर्यभूमी यांना जगामध्ये प्रतिष्ठा लाभली.
‘परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण म्हणजेच खरा संन्यास’, हे वचन सार्थ!
भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीबद्दल गाढ अभिमान असला, तरी त्यात शिरलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, जातीभेद यांसारख्या हीन गोष्टींवर त्यांनी भाषणांतून कडाडून हल्ला चढवला व निद्रिस्तांना गदागदा हालवून जागे केले. अशा वेळी ते सौदामिनीच्या अभिनिवेशाने समाजातील निष्क्रीयतेवर प्रहार करत आणि आपल्या देशबांधवांना जागे होण्यासाठी कळकळीचे आवाहन करत.
निराकार समाधीत मग्न रहाण्याची स्वत:ची स्वाभाविक प्रवृत्ती बाजूला सारून त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या सुखदु:खाचा ऐहिक पातळीवरही विचार केला आणि त्यांच्यासाठी झटले व ‘परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण म्हणजेच खरा संन्यास’, हे वचन सार्थ केले.
इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी व हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन व प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत व वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे.
ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेल्या तेजस्वी व ध्येयवादी व्यक्तीमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंदआहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी`आंतरराष्ट्रीय युवकदिन’ साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्यानंतर भारतभूमी व हिंदु धर्म यांची झालेली दुरवस्था रोखण्यासाठी आजही स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी विचारांची गरज आहे, याची जाणीव भारतवासीयांना व्हावी, यासाठीच हा लेखप्रपंच!
Last Words
मित्रांनो तुम्हाला Swami Vivekananda Marathi Nibandh कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. निबंध पुर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.
Read Also