दिवाळी मराठी निबंध

Diwali Nibandh Marathi: दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आल्याच्या आठवणी म्हणून साजरा केला जातो. राम हा एक अतिशय लोकप्रिय हिंदू देवता आहे जो आपल्या सत्यतेबद्दल आणि शुद्धतेसाठी आदरणीय आहे.

Diwali Rangoli Design
Diwali Nibandh Marathi

विद्यार्थ्यांना शाळेत असताना उत्सव सण याविषयी निबंध लेखन असते. दिवाळी हा मराठी संस्कृती मिळेल सर्वात मोठा आनंदाचा रोषणाईचा उत्सवाचा उत्सव आहे याविषयी आपण निबंध पाहणार आहोत सदर निबंध इयत्ता पहिली दुसरी चौथी ते सहावी सातवी दहावीपर्यंत कुणालाही उपयुक्त आहे. सदर निबंध तुमच्या लेखनाला निश्चितच सहाय्यक ठरेल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया

Diwali Nibandh Marathi, Nibandh Marathi Madhe, Diwali Essay In Marathi, Essay On Diwali In Marathi, माझा आवडता सण – दिवाळी निबंध, Marathi Essay on Diwali, Marathi Nibandh Diwali.

Read Also: दिवाळी वरील इतर महत्त्वपूर्ण निबंध

दिवाळी वर मराठी निबंध – Diwali Nibandh Marathi

10 Lines on Diwali in Marathi

  1. दिव्यांचा सण म्हणजे दीपावली.
  2. दिवाळी हा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो.
  3. दिवाळीच्या दिवसात घरापुढे सुंदर रांगोळ्या काढतात.
  4. अशा या दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप मौजमजा करायला मिळते.
  5. अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते.
  6. दिवाळीच्या पाच दिवसात घरापुढे कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास करतात.
  7. फटाक्यांबरोबर मुलांना दिवाळीत नवीन नवीन व छान कपडे मिळतात.
  8. दिवाळीतील एक दिवस लक्ष्मीपूजन असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.
  9. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. म्हणून दिवाळी हा सण मला खूप आवडतो.
  10. सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

मराठी दिवाळी लहान निबंध (150 Words)

Short Essay On Diwali In Marathi: दिवाळी येण्यापूर्वी त्याच्या स्वागताची तयारी सर्वजण करू लागतात आणि एकमेकांना सांगतात, ” आली, दिवाळी आली!” दिवाळी हा भारतात सर्वत्र साजरा केला जाणार असं नाही. दिवाळीच्या दिवसात असं नाही. हा जणू सणांचा एक महरचा आहे. ! माणसाला मनातील सर्व उदात्त भावना यात व्यक्त होतात. अश्विन महिन्यात द्वादशीला” वसू भारत” सवत्स म्हणजे वासरासह गायीची पूजा केली जाते.

आपल्याला दूध देणाऱ्या गोमातेची ही पूजा असते. धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते: तर लक्ष्मीपूजनाला व्यापारी लोक आपल्या चोपड्या ची पूजा करतात. धन मिळाले तर माणसाने गर्व करू नये, ही शिकवण मिळते. नरकचतुर्थीला नरकासुराचा म्हणजे वाईट वृत्तीचा सहार करायचा असतो; तर बलिप्रतिपदेला दानशूर बळीचा गौरव गुणाची गौरव करायची असते. भाऊबीज ही बहिण भावाच्या निर्मळ प्रेमाचे प्रतीक आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. पण त्या आकाश कंदील आणि रोषणाई करून तिचे स्वागत करायचे. नवे कपडे घालायचे. आप्त, मित्र फराळ करायचा रात्री खूप फटाके उडवायचे.रोजच्या कटकटी विसरून, आनंदाने सर्वांनी एकत्र येऊन मजा करायची, हा संदेश दिवाळी येते.; असण्याचा नाही म्हणून इतर धर्मांनी या सणासाठी आमंत्रित केले जाते

दिवाळी निबंध मराठी मध्ये (200 Words)

अशा या दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप मौजमजा करायला मिळते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. म्हणून दिवाळी हा सण मला खूप आवडतो.

सण हा आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. आपल्या देशात अनेक प्रकारचे सण साजरे होतात. दिवाळी, दसरा, होळी, नाताळ, पोंगल, ओणम,रक्षाबंधन, ईद,पोळा यासारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

या सर्व सणापैकी दिवाळी हा माझा आवडता सण आहे. अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते. दिवाळी हा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो. दिवाळीच्या पाच दिवसात घरापुढे कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास करतात. दिव्यांचा सण म्हणजे दीपावली.

दीप आपल्याला प्रकाश देतो. त्याप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने ‘अंध:कार दूर करा व आपलं मन चांगल्या भावनेने उजळून टाका’, असा दीपकचा अर्थ आहे. दिवाळीच्या सणातून आपण ऐक्य भावना शिकतो.

दिवाळीच्या दिवसात घरापुढे सुंदर रांगोळ्या काढतात. मुले घरासमोर मातीचे छोटे-छोटे किल्ले बांधतात. फुलबाजा, फटाके, भुईचक्र, अनार असे फटाके लावून मुलं दिवाळीच्या दिवसात आनंदात असतात. फटाक्यांबरोबर मुलांना दिवाळीत नवीन नवीन व छान कपडे मिळतात. घरात लाडू, करंज्या, चकल्या वगैरे फराळाचा घमघमाट सुटलेला असतो. मिठाईचे डबे घरात येतात. लहान मुलांची तर चंगळ होते.

शाळेला सुट्टी असल्यामुळे परीक्षेची चिंता नसते. दिवाळीतील एक दिवस लक्ष्मीपूजन असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.

भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. दूर रहात असलेला भाऊ या दिवशी बहिणीकडे येतो. काही ठिकाणी भाऊबीजेला चंद्राला ओवाळण्याची प्रथा आहे. सर्वच जण दिवाळी हा सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करतात.

Read Also: माझी आई मराठी निबंध

दिवाळी विषयी निबंध (300 Words)

भारतात सर्व सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळी! दिवाळीला “दिपावली” असे देखील म्हणतात. हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई असते. संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळवून टाकायचा असतो.

इंग्रजी महिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळी हा सण असतो. तब्बल चार दिवस या सणाचे महत्त्व असते. शेतीची सर्व कामे संपून धान्य घरी आणले की हा सण साजरा केला जातो. त्याअगोदर घराची आणि परिसराची स्वच्छता केली जाते. आश्विन महिन्याचा शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवात, असे या सणाचे दिवस असतात.

दिवाळी अगोदर छान छान तिखट-गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा असे मुख्य पदार्थ तर बनवले जातातच. याशिवाय बेसन आणि रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चिक्की असे पदार्थही आता बनवले जातात. घरातील सर्वांना नवीन कपडे घेण्याचा हा मुहूर्त असतो.

दिवाळीअगोदर सर्व खाद्य पदार्थांची आणि वस्तूंची खरेदी केली जाते. आकाशकंदील, रांगोळी, फटाके, सुगंधित उटणे, साबण, पणत्या इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळीअगोदर एक दिवस आकाश कंदील आणि विजेच्या दिव्यांची माळ घराभोवती सजवली जाते. सर्वजण मिळून खाद्यपदार्थ बनवतात.

लहान मुलांना दिवाळी म्हणजे एक आनंदाचे पर्व असते. पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड-तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते.

घरातील मुली आणि स्त्रिया घरापुढे छानशी रांगोळी काढतात. धनत्रयोदशीला संपत्तीची आणि धनाची पूजा करतात. नरक चतुर्थीला सकाळी लवकर उठून अंघोळ केली जाते. सुगंधित उटणे आणि तेलाने स्वच्छ अंघोळ केली जाते. त्यानंतर फराळ केला जातो. त्यानंतरचा दिवस म्हणजे दीपावली पाडवा किंवा बलिप्रतिपदा! या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींचे आणि वस्तूंचे औक्षण केले जाते.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे भाऊबीज! बहीण भावाला ओवाळते. भावाने नंतर काहीतरी भेट वस्तू देण्याची प्रथा आहे. भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील गोडवा त्याद्वारे स्पष्ट होतो. असा हा दिवाळीचा सण खूप आनंद, रोषणाई, सुख आणि समाधान घेऊन येत असतो. त्यामुळे माझा दिवाळी हा आवडता सण आहे.

Read Also: डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी निबंध

दिवाळी निबंध मराठी (600 Words)

भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.

आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.

दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते.

सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.

दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली.

तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे. अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते.

घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात.

पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो.

अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.

असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.

श्रीरामांचे स्वागत यासाठीही अधिक महत्वाचे होते कारण श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते, त्यावेळी त्यांनी महामायावी दानव रावण याचा वधहि केला यामुळे हे स्वागत फार उत्साहाचे होते.

दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात. यामूळे मला दिवाळी हा सण खूप आवडतो.

Read Also

इनका नाम राहुल सिंह तंवर है, इन्होंने स्नातक (रसायन, भौतिक, गणित) की पढ़ाई की है और आगे की भी जारी है। इनकी रूचि नई चीजों के बारे में लिखना और उन्हें आप तक पहुँचाने में अधिक है। इनको 3 वर्ष से भी अधिक SEO का अनुभव होने के साथ ही 3.5 वर्ष का कंटेंट राइटिंग का अनुभव है। इनके द्वारा लिखा गया कंटेंट आपको कैसा लगा, कमेंट बॉक्स में जरूर बताएं। आप इनसे नीचे दिए सोशल मीडिया हैंडल पर जुड़ सकते हैं।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here